मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड तालुक्यातील वाकोद गावचे सुपुत्र असलेले किरण बिडवे यांची राज्य शासनाने नुकतीच DYSP पदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल आज (शनिवारी) भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया मराठवाडा विभाग प्रदेश सदस्य निवृत्ती पाटील सपकाळ यांनी वाकोद येथे त्यांची भेट घेऊन दिपावळी व DYSP पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी गावांतील नागरिक वर्ग उपस्थित होते.