खुलताबादेत महसूल ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ईद-ए-मिलाद निमित्त बैठक संपन्न.

By | October 18, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – खुलताबाद : ईद – ए – मिलाद निमित्त राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील जरजरी बक्ष दर्गाला भेट दिली. यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपअभियंता मिलिंद नाकाडे, रोशन महाजन, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाटे, नगराध्यक्ष ऍड. सय्यद मुकोनुद्दीन , सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती कुशोर बलांडे, पोलीस निरीक्षक सीताराम  म्हेत्रे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, सतीश ताठे, दर्गा अध्यक्ष फजिलत अहेमद ईसाक, माजी नगराध्यक्ष ऍड. कैसरोद्दीन , सलीम कुरेशी, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरपोद्दीन महंमद रमजाने, नगरसेवक मूनुउद्दीन मुजिबोद्दीन, अब्दुल हाफिज रशीद, मो. नईम मो. बक्ष आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.