खुलताबादेत वंचित बहुजन आघाडीची आढावा समन्वय बैठक संपन्न.

By | November 1, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय. बाळासाहेब आंबेडकर. व प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आज औरंगाबाद जिल्हा पश्चिम अंतर्गत खुलताबादेत आढावा समन्वय बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष  जिल्हा अध्यक्ष योगेश बंन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात ही बैठक बोलावण्यात आली होती होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुका तोंडावर आल्यामुळे  खुलताबाद शहर वार्ड, गट, गण, सर्कल, बूत, शाखा बांधणी, व इतर बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मोठ्या उत्साहाने काम करण्यास  आव्हान करण्यात आले. जेणेकरून तालुक्यातून वंचित बहुजन आघाडी चे प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जे काही वंचित लोकांचे प्रश्न असतील ते मांडण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी सक्षम राहतील व राजकारणापासून कोणीही वंचित राहणार नाही. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे व राहील. यावेळी जिल्हा महासचिव रवी तायडे, जिल्हा संघटक सुभाष कांबळे, बाबा पटेल, कोतकर, कार्यक्रम प्र. पिके दाभाडे, मीडिया प्र. बाबासाहेब वक्ते, राजाराम घुसळे, नितीन जाधव ,वीरेंद्र वाघ, नामदेव भालेराव, अकबर शेख, असलम मोमीन, मनोज कुचे, अण्णा बनकर, लखन जाधव,बाळु भालेराव, राजू गुंजाळ,लखन देवरे, सर्कल, गण,शहर,शाखा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने   उपस्थितअसून तालुकाध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांनीआलेल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करून  आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.