गिफ्टचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधमाला अटक.

By | November 12, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  नागपूर : गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून शेतात नेत १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना काटोलमध्ये उघडकीस आली असुन याप्रकरणी काटोल पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन युवकांना अटक केली.
नितीन रमेश चरकारे (वय २८, रा. पंचवटी) व सनी ऊर्फ कैलास प्रजापती (वय २६, रा. काळे चौक, काटोल) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी दहावी उत्तीर्ण आहे. ती नितीनला ओळखते. सनी हा नितीनचा मित्र असून, तो वाहतूकदार आहे. ८ नोव्हेंबरला सकाळी नितीन हा विद्यार्थिनीला भेटला. तिला गिफ्ट देण्याचे आमिष दाखविले.
त्याने तिला मोटारसायकलवर बसविले. दरम्यान, मध्ये सनी त्याला भेटला. तिघेही जलालखेडा परिसरातील शेतात गेले. तेथे सनीने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. सायंकाळी विद्यार्थिनीला घरी सोडले. नातेवाइकांनी विचारणा केली. नितीनच्या मदतीने सनीने शेतात अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनीसह नातेवाइकांनी काटोल पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नितीन व सनीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published.