दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येणार – विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती.

By | October 25, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात आनंदात जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.