देगलूर पोटनिवडणूक – भाजपला पराभवाचा धक्का, काँग्रेसचा विजय.

By | November 2, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1,08,840 मतं मिळाली आहेत. अंतापूरकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 41,933 एवढ्या मतांनी हरवले आहे. ही निवडणूक सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी या ठिकाणी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांना 11,347 मतं मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.