महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून कोरड्या हवामानाचा अंदाज.

By | November 26, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मागील काही दिवसात पावसाने चालीचं हजेरी लावली आहे. तर राज्यात मागील काही दिवसापासून ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली असल्याचं दिसत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून कोरड्या अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मंगळवारी हलक्या ते मध्यम पावासाने हजेरी लावली आहे. तर राज्यातील कोल्हापुर , सोलापूर , लातूर या जिल्ह्यांमध्ये काल बुधवारी पाऊसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तर राज्यात आजपासून हवामानात चांगलीच वाढ होणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात आता अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे, तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे.

राज्यातील नाशिक ३२.४ (२१.५), निफाड ३० (१८.२), सांगली ३१.३ (२२.२), सातारा २८.६(२३.३), सोलापूर ३४.२ (२०.५), सांताक्रूझ ३३.२ (२६.२), अलिबाग ३०.८ (२५.४), डहाणू ३२.२ (२६.३), रत्नागिरी ३२.९ (२५.१), पुणे ३३.७ (२१.२), नगर -(२२.२), ब्रह्मपुरी ३४.८ (२०.८), बुलडाणा ३२ (२०.९), चंद्रपूर ३१.४ (२१.६), गडचिरोली ३२ (२०.८), गोंदिया ३० (१९.६), नागपूर ३२ जळगाव ३४.२ (२१), कोल्हापूर ३१.७ (२२.२), महाबळेश्‍वर २४.७ (१८.४), मालेगाव ३०.४ (२४), औरंगाबाद ३४ (२१.८), नांदेड – (२३), उस्मानाबाद – (२१.२), परभणी ३४.८ (२२.७), अकोला ३४ (२२.६), अमरावती ३२ (१९.१), (१९.६), वर्धा ३२.६ (२१), वाशीम ३३.५ (१९), यवतमाळ ३५.५ (२०). या जिल्ह्यांमध्ये काल बुधवारी (ता. २४) नोंदले गेलेले कमाल तापमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.