येत्या काही तासांत पावसाचा इशारा, या जिल्ह्यात मुसळधार.

By | November 14, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज (रविवारी) पुणे जिल्ह्यासह १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.