राज्यात “या” तारखेला पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.

By | November 10, 2021
महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.