राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला मारहाण, राज्यात खळबळ, आरोपीला बेड्या.

By | November 19, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी हे एका अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाला शहरात उपस्थित होते. त्यावेळी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायदळे, बखीयार खॉन, जुबेर बिन हवेल यांच्याबरोबर बोलत होते. याच दरम्यान बीन किबेल नामक व्यक्ती अचानक समोर आली आणि त्या व्यक्तीने आमदार दुर्रानी यांच्यावर हल्ला केला मारहाणीचा प्रयत्न केला दुर्राणी समर्थक यांनी तातडीने त्यास त्याबाबत घेतली त्यांने आपल्याकडे पिस्तूल असले असते तर गोळ्या घातल्या असत्या असे ओरडत धमकावले.
मिळालेल्या माहितीनुसार आ.दर्राणी उभे असतांना अचानक अजिज मोहल्ल्यात अरब गल्लीत राहणारा मोहम्मद बीन सईद बीन की बेल हा आमदार दुर्रानी यांच्या जवळ आला आणि काहीही न बोलता अचानक पणे त्यांना शिवीगाळ करत तोंडावर गालात थापटा मारण्यास सुरुवात केली. यावेळी आमदार दुर्रानी यांनी काय झाले मला का मारतो अशी विचारणा केली या व्यक्तीने आज माझ्याकडे रिवाल्वर नाही नाहीतर तुला गोळ्या घालून ठार केले असता अशी जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासोबत असलेले लोकांनी सोडवा सोडवी केली याच वेळी हा व्यक्ती तिथून पसार झाला या व्यक्ती पासून माझ्या जीवनात धोका असून हा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे. या गुंडावर कारवाई व्हावी अशी तक्रार आमदार अब्दुल्लाखान दुर्राणी उर्फ बाबाजानी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.