खिदमत ग्रुप कन्नडच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न; 79 जणांनी केले रक्तदान.

By | October 22, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड : शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खिदमत ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आज (शुक्रवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराचे ग्रामिंरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता देगावकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. शिबिरात 79 तरुणांनी रक्तदान केले यावेळी डॉ.देगावकर म्हणाले की रक्तदान करणे आणि रक्तदान शिबीरे ही आजच्या काळाची निकड बनली आहे. मागील काही महिन्यांपासून कोविड से गंभीर आजाराने सगळीकडे थैमान घातले असताना राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गंभीर संकट ओढावले होते.रक्तदान करून आपण रुग्णांचे जीव वाचवू शकतो. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे.याचबरोबर करोनासारख्या घातक आजाराला दूर सारण्यासाठी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी डॉ.दीपाली पांचाळ, डॉ.ज्युलि खणके,डॉ.दीपमाला कारंडे,स्नेहा अग्रवाल, प्रतीक्षा गायकवाड,गणेश गवळी, शेख सादिक,अलिखान शेख,युसूफ राजपूत आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामाजिक आणि राजकीय आणि कन्नडच्या सर्व  सामाजिक ग्रुप चे लोकाने  सहभागी घेतला रक्तदान शिबिर मधे खिदमत 
 ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.