Breaking – मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा, सोशल मीडियावर चुकीचा फोटो व्हायरल.

By | October 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने तीन दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आज (16 ऑक्टाेबर 2021) सकाळपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती.
हाॅस्पिटलमधील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर ‘पोस्ट’ करुन ते मनमोहन सिंह असल्याचे सांगण्यात येत होते. फोटोसोबत मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे दुर्दैवी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो..’ असे फोटोखाली म्हटले होते.
प्रकृती ठणठणीत.
दरम्यान, याबाबत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेच खुलासा केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोचा मनमोहन सिंह यांच्याशी संबंध नाही. ताप आल्यामुळे बुधवारी (ता.13) मनमोहन सिंह यांना एम्स रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनीही नुकतीच रुग्णालयात जाऊन मनमोहन सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.