अहमदनगर येथील अवतार मेहेरबाबा.

By | October 16, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ‘अवतार मेहेरबाबांच्या’ वास्तव्याने पुनित झालेले ‘मेहराबाद’ नगर-दौंड रस्त्यावर अरणगावजवळ वसले आहे. अवतार मेहेरबाबांनी इ.स. १९२३ मध्ये येथे आश्रम सुरू केला. काही वर्षानंतर मुलांसाठी शाळा, तसेच कुष्ठरुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. 
१० जुलै १९२५ पासून बाबांनी मौनव्रत धारण केले. ही मौनावस्था महासमाधीपर्यंत टिकली. ३१ जानेवारी १९६९ रोजी अवतार मेहेरबाबांनी देहत्याग केला. या टेकडीवर त्यांची समाधी आहे. शांतता व पावित्र्य ही या स्थळाची वैशिष्ट्ये आहेत.
 जवळच बाबांची कुटी व संग्रहालय आहे. मेहेरबाबांनी वापरलेला वर्णमाला फलक, कपडे, छायाचित्रे, सायकल आदी वस्तू या संग्रहालयात पहायला मिळतात. मेहेराबाद परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी शिलालेख उभारण्यात आले आहेत.
बाबांचे जगभरातील भक्त वर्षभर मेहेराबाद येथे येत असतात. बाबांची जयंती (२५ फेब्रुवारी) व अमरतिथी (३१ जानेवारी) हे उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. अरणगाव येथे मेहेरबाबा ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य सेवा दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.