तरुण शेतकऱ्यांचे, स्वप्न उद्ध्वस्त – सरदार वाबळे सर.

By | October 14, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून शिक्षण घेतलं. पण नोकरीची संधी मिळाली नाही. म्हणून वडिलोपार्जित शेतीचा  वारसा सांभाळण्यासाठी तरुण शेतकरी पुढे सरसावला. शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा महासम्राट बळीराजाचा शेतीचा वारसा  सांगणाऱ्या शेतकरी बापाचा शेतीचा वारसा सांभाळत. नव्या उमेदीने आणि भविष्यातील स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून, शेतीत वापरत आहे.
शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात का विकतं.  या तंञाचा वापर करून या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाजाराचा अंदाज घेऊन, शेतात विविध पिकांची लागवड करून, आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यास तो मातीत राबत होता.
मागील वर्षी प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेली. या वर्षी  मॄग नक्षत्रा पासूनच चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर  झाली. शेतातल्या पेरलेल्या बियानांना अंकुर फुटल्या पासूनच जीवापाड जपुन लागला. आर्थिक तरतूद करून महाग झालेल्या रासायनिक खतांची कशीतरी खरेदी करून आपल्या पिकाला सोडली. रानात पीक भहरली. भहरलेल्या पिकांना पाहून तरुण शेतकऱ्यांना आपले स्वप्न साकार होताना दिसत होते.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणत. खरा भारत खेड्यात आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे.  म्हणून खेड्याकडे चला अशी हाक त्यांनी दिली होती. त्याच खेड्यात आता शिकलेल्या शेतकऱ्यांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे. शेतीचा वारसा सांभाळणारे  शेतकरी  मातीत अहोरात्र राबत असतात. ऊन, वारा, गारा सहन करून हाडाची काड करून, हा बळीराजा माय मातीत राबत असतो.
शेतात भरघोष उत्पन्न आल्यावर शेतमालाचे बाजारभाव पडतात. म्हणजे जाणून-बुजून बाजार भाव पाडले जातात? हा संशोधनाचा विषय आहे.  शेतमालाचे भाव पडतात, तेव्हा शेतकरी  बाजाराला दोषी ठरवतो. परंतु जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा मात्र तो दैवाला दोष देतो. यावर्षी प्रचंड पाऊस पडल्यामुळे मका,मिरची, सोयाबीन, कापूस, टोमॅटो, आद्रक, भाजीपाला ही पीक उद्ध्वस्त झाली. या पिकाच्या नुकसानी बरोबरच तरुण शेतकऱ्यांचे भावी स्वप्नही उद्ध्वस्त झाले.हे तितकंच खरं.
शासन स्तरावर पाहणी झाली. दौरै झाले.  शेतकरी आता आर्थिक मदतीची वाट पाहतो आहे. अस्मानी संकट झेलण्याची सवय शेतकऱ्याला शेकडो वर्षापासून आहे. पुन्हा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षी तो नियोजनात गर्क होईल. हेच खरं. या माझ्या बळीराजाला मातीत राबण्यासाठी प्रचंड बळ मिळो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
शब्दांकन :- सरदारर वाबळे सर, ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published.