पुढील काही तास महत्त्वाचे! राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी.

By | October 16, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – दोन  दिवसांपूर्वी राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला असून राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. 
 असं असलं तरी पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 
 ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी :आज नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण 11 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. 
 उद्याही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  त्यामुळे हवामान खात्याने  परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.