प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मेहनतीने डकल्याची कुमारी शिल्फा फरकाडे” लष्करी सेवेत.

By | November 24, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  औरंगाबाद जिल्ह्यातील पहिलीच  मुलगी लष्करात, आईने शेतीकरून मुलीतील “जिजाऊ’ घडवली.
सिल्लोड – स्त्री म्हटले की चूल आणि मूल यातच गुरफटणारे व्यक्तित्व. कल्पना चावला ,कर्नल स्वाती महाडिक,किरण बेदी या सारख्या धुरंधर महिलांनी  देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले.लष्करी सेवा म्हटले की रोमांचकारी ,अंगावर शहारे आणणारे जीवन नजरे समोर येते. “ड्युटी अनटील डेथ ” हे ब्रीद व देशसेवा, मातृ भूमीचे ऋण फेडावे या उद्देशाने प्रेरित होऊन,ध्यास घेऊन सिल्लोड तालुक्यातील डकला या डोंगराळ ,दुर्गम भागातील शिल्पा पा. फरकाडे या  शेतकरी कुटुंबातील अवघ्या 21 वर्षीय तरुणीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय  संरक्षण  सेवा म्हणजे लष्करात मानाची नोकरी मिळवली आहे.नुकत्याच त्यांना नागालँड मध्ये आसाम रायफल मध्ये” रायफल वुमन” म्हणून पदभार मिळाला आहे.नागालँड मधील सुखोवी या ट्रेनिंग सेंटर मध्ये नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून गावी आलेल्या शिल्पाचा गावाने नागरी सत्कार ही केला आहे व तालुक्यातुन अनेकांनी त्यांचा सत्कार ही केला आहे. आज बुधवारी भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया मराठवाडा विभाग सदस्य निवृत्ती पाटील सपकाळ यांनी त्यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लहानपणापासून स्पोर्ट ची आवड असलेल्या शिल्पाने पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न बघितले होते मात्र मातृभूमीच्या सेवेसाठी आपण अधिक योग्य आहोत गे कॉलेज जीवनात शिल्पाला जाणवू लागले व त्या दृष्टीने अभ्यास व कसरत सुरू झाली.प्राथमिक शिक्षण गावात सुरू झालेल्या शिल्पाला गावात शिक्षणाची सुविधा नसल्याने माध्यमिक शिक्षणा साठी पैठण येथे कन्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला.सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातुन बी .एस .सी.ची पदवी प्राप्त करून आर्मी भरती ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्या नुकत्याच आसाम रायफल मध्ये भरती झाल्या आहेत.2017 -2018 मध्ये कॉलेज तर्फे त्यांनी जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्षणीय सहभाग नोंदवला आहे.त्यांची खेळातील निपुनता बघून त्यांची आई त्यांना “जिजाऊ “म्हणायची. आई सोबत ,मामा,भाऊ ,यांनी शिल्पास नेहमीच प्रेरणा दिली आहे.तिचा भाऊ ही बहिणी पासून प्रेरणा घेऊन आर्मीत जाण्याचा उत्सुक आहे.                

Leave a Reply

Your email address will not be published.