विकेंडला विदर्भात मेघगर्जनेसह धुव्वाधार पाऊस; “या” तारखेला मुसळधारची शक्यता – Maxmarathi

By | October 14, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पुर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून मान्सून माघारी परतला आहे. तसेच पुढील एक-दोन दिवसांत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण विकेंडला विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार (Rain alert) पावसाची शक्यता आहे.
शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील 14 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.