शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज.

By | November 13, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नवीन कृषी विधेयक आणल्यानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी भेट देणार आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा गट स्थापन केला आणि शेतीआधारित उत्पादन घेण्याची तयारी दाखविल्यास मोदी सरकार अशा शेतकरी गटाला 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदी सरकारने पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana) नावाने ही योजना सुरू केली आहे. या कर्ज योजनेबाबत अधिक जाणून घेऊ या…
शेती आधारित व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी हे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी 11 शेतकऱ्यांना एकत्र येऊन एखादा गट किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. या गटाला वा कंपनीला कृषी आधारित उत्पादन घेण्याच्या व्यवसायासाठी हे कर्ज मिळणार आहे.
केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजनेंतर्गत शेतकरी गटाला 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यातून शेतीसंबंधी उपकरणं, खतं, बी-बियाणं, तसेच नव्या व्यवसायासाठी लागणारी आवश्यक उपकरणे शेतकरी खरेदी करू शकतात.
दरम्यान, या योजनेसाठी शेतकऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सरकारने अजून या योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. मात्र, सरकार लवकरच पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजनेसंबंधी परिपत्रक प्रसिद्ध करणार असल्याचे समजते. नोंदणी प्रक्रिया सुरू होताच शेतकरी अर्ज करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published.