Big Breaking : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक राज्यस्तरीय समितीवर.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नैसर्गिक संकेताच्या आधारे मागील वीस वर्षांपासून पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणारे मराठवाड्याचे सुपूत्र हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डक यांची लवकरच राज्यस्तरीय शासकीय समितीवर निवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ही निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी (दि. ५) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी या निवडी संदर्भात डक यांच्याशी मंत्रालयात चर्चा केली.
परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगांव ता. सेलू येथील शेतकरी कुटूंबात जन्म झालेले पंजाबराव डक १९९५ पासून हवामानाचा अभ्यास करतात. नैसर्गिक संकेताचा आधार घेवून ते पावसाचा अचूक अंदाज वर्तवितात. मोबाईल मॅसेज, युट्यूबच्या माध्यमातून त्याचा प्रसार करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सावधानतेचा ईशारा देतात. २०२१ मध्ये त्यांनी वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे त्यांचे नाव राज्यभर झाले. आता त्यांची कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार, आणि प्रचार कण्यासाठी राज्यस्तरीय शासकीय समितीवर निवड केली जाणार आहे. या निवडीचा शेतकऱ्यांना लाभ होणार असून समुह शेतीला चालना मिळणार आहे. कृषि मंत्री दादा भुसे, खा. प्रतापराव जाधव, आ. बाबाजाणी दुर्राणी यांनी मंत्रालयात डक यांच्याशी या निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम – पंजाब डख.

कृषि विभागाच्या राज्यस्तरीय समितीवर होणाऱ्या या निवडीमुळे मला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करता येणार आहे. आत्मा अंतर्गत असंख्य योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना संघटीत करून या योजनांची माहिती देण्यासाठी आपण त्यांचा प्रचार, प्रचार करून समुह शेतकीला चालणा देण्याचा प्रयत्न करणार आहोत -पंजाबराव डक, हवामान तज्ज्ञ, परभणी.

Leave a Reply

Your email address will not be published.