पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके व एका खाजगी कर्मचारी १ लाख ३० हजार लाचप्रकरणी गुन्हा दाखल.

By | October 24, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ‘पैठण गंगापूर हद्दीतील शेंदुरवादा येथील खामनदी परिसरातून हायवा ट्रक मधून वाळू वाहतूक  करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयाची लाच मागणी करणारे पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके व खाजगी इसम नारायण वाघ यांच्याविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल.
   अधिक माहिती अशी की पैठण गंगापूर हद्दीतील शेंदुरवादा येथील खामनदीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूचासाठा जमा झाल्याने या परिसरातील वाळू उत्खनन दोन हायवा ट्रकना वाहतूक करण्याचा करण्यासाठी वाळूचा व्यवसाय असलेले एका तक्रारदाराकडून खाजगी इसम नारायण वाघ यांनी पंच समक्ष १ लाख ३० रुपयांची हप्ता मागणी केली त्यानंतर वाळू वाहतूक करणारे तक्रारदार यांची  तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सोबत चेंबरमध्ये समक्ष भेट घेण्याची सूचना दिल्या त्यानुसार तक्रारदार तहसीलदार शेळके यांनी लाच घेण्याची समर्थन करून लाच घेण्याबाबत प्रोत्साहन दिले यामुळे चैंबर बाहेर येताच सदरील तक्रारदाराकडून खाजगी इसम नारायण वाघ यांनी लाचेची मागणी केली सदरील तक्रार दाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केल्यानुसार  ला.प्र.वि पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपाधिक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस हवालदार गंगाधर भुताने, राजेंद्र जोशी, पोलीस नाईक भूषण देसाई, पो.अंम सांगतो बागुल यांनी  सापळा रचून ही कारवाई केली यावेळी हॅश व्हॅल्यू घेण्यात आले या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून यापूर्वी देखील या तहसीलचे तत्कालीन तहसीलदार महेश सावंत यांच्यावर देखील मोठी लाच यातले जी कारवाई करण्यात आली होती.
  

Leave a Reply

Your email address will not be published.